e-Mumbaikar Rss

‘हरिश्चंद्राच्या फॅक्टरी’ला परदेशी समीक्षकांचीही पसंती!

By : Admin | Category : ठळक घडामोडी | On : 03-01-2010 | Comments : 0

भारताप्रमाणेच जगभरातील समीक्षकांना परेश मोकाशी दिग्दर्शित ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटाने भुरळ घातली आहे. अमेरिकेतील ‘हॉलीवूड रिपोर्टर’ या चित्रपटविषयक दैनिकाने ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे ‘इंडिवायर’ या सिनेसंकेतस्थळावर ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अ‍ॅनी थॉम्प्सन या लेखिकेनेही भावी ऑस्कर पुरस्कार विजेत्यांच्या यादीत ‘फॅक्टरी’चा समावेश केला आहे. चित्रपट समीक्षकांप्रमाणे प्रेक्षकांनीही या चित्रपटाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरण्यासाठी ‘फॅक्टरी’ला ६४ चित्रपटांशी स्पर्धा करायची आहे.

‘हरिश्चंद्राची फॅक्टरी इज कम्प्लिट डीलाईट’ अशा शब्दांत कर्क हनीकट या ‘हॉलीवूड रिपोर्टर’ या सिने दैनिकाच्या समीक्षकाने या चित्रपटाला गौरविले आहे. हनीकट लिहितो की, गेली वीस वर्षे नाटय़क्षेत्रात काम करणाऱ्या परेश मोकाशी यांनी हा चित्रपट तयार केला आहे. त्यामुळे पहिला चित्रपट तयार करणाऱ्या भारतीयावर सिनेमा करताना ‘फॅक्टरी’चा दिग्दर्शकही प्रथमच चित्रपटनिर्मितीचा अनुभव घेत होता. दिग्दर्शक परेश मोकाशी आणि पडद्यावरील धुंडीराज फाळके या दोघांना मिळालेला प्रथम निर्मितीचा आनंद, हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांनाही मिळतो.

Share |

Post a comment

Type in Marathi (Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

Powered By