e-Mumbaikar Rss

‘हॅपी न्यू इयर टु यू.’

By : Admin | Category : बोल मुंबई बोल | On : 30-12-2009 | Comments : 2

आयुष्यातला प्रत्येक दिवस, कॅलेंडरच्या पानाबरोबर सहजपणे पलटत असतो. प्रत्येक दिवसाला एक गती असते, क्षिती असते. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी स्मरणीय, विलोभनीय किंवा कठीण, क्लेशकारक असतोच असं नाही. रोजचा दिवस येतो-जातो. माणसानं स्वत:च्या दु:खाला बाजूला सारण्यासाठी सणासुदीच्या दिवसाची तरतूद करून सामूहिकरीत्या सुख, आनंद लुटायची कल्पकता दाखविली आहे. समूहमनाचा हा आनंद सोहळा प्रत्येकाला नवी उमीर्, नवी ऊर्जा देत असतो.

राज ठाकरे ‘मटा नायक’

By : Admin | Category : ठळक घडामोडी | On : 30-12-2009 | Comments : 0

‘मराठीपणा’चा एल्गार करीत मुंबईसह महाराष्ट्रात तुफान उठवून पहिल्याच विधानसभा निवडणुकीत १३ आमदारांची फौज उभी करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कामगिरीला ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांनी मन:पूर्वक सलाम केला आहे.

सर्व पोलिसांना थर्टी र्फस्टची ड्युटी

By : Admin | Category : ठळक घडामोडी | On : 29-12-2009 | Comments : 0

३१ डिसेंबरच्या रात्री मुलींची छेड काढण्याचे प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी यंदा लेडीज स्पेशल पथके तयार केली आहेत. दरवषीर् थटीर् र्फस्टला घडणारे विनयभंगाचे प्रकार पोलिसांची बेअब्रू वेशीला टांगतात. ते घडू नयेत यासाठी मुंबईतले सगळे लहानमोठे पोलीस अधिकारी कर्मचारी रस्त्यावर उतरून परिस्थिती नियंत्रणात ठेवणार आहेत.

नेहरु विज्ञान केंद्रात उभारणार देशातील पहिली ‘एन-गॅलरी’

By : Admin | Category : ठळक घडामोडी | On : 29-12-2009 | Comments : 0

अणुऊर्जा आणि अणुऊर्जा निर्मिती प्रक्रियेसंदर्भात योग्य प्रबोधन व्हावे म्हणुन नेहरु विज्ञान केंद्र आणि न्युक्लीअर पॉवरी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसाआयएल) मिळून नेहरू विज्ञान केंद्रात ‘एन-गॅलरी’ तयार करत आहेत. अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात प्रबोधन करणारी ही देशातील पहिलीच गॅलरी ठरणार आहे.

ध्यास माय मराठीच्या उत्कर्षाचा

By : Admin | Category : ठळक घडामोडी | On : 28-12-2009 | Comments : 0

मराठी समाज हा सुसंस्कृत आणि सुशिक्षित असला तरी तो एकवटलेला नाही. अनेक क्षेत्रात मराठी माणूस अग्रक्रमावर असला तरी त्याच्या बुद्धिमत्तेचा समाजास हवा तसा उपयोग होत नाही. हे चित्र बदलण्यासाठी डोंबिवली आणि मुंबईतील धडपड्या तरुणाईने ‘माय मराठी’ ही चळवळ सुरू केली आहे. मराठी माणसाच्या उन्नतीसाठी एक सकारात्मक आणि विधायक ताकद उभी करण्यासाठी ही संस्था प्रामाणिक प्रयत्न करत आहे.

अश्लील व बीभत्स कार्यक्रमांचे प्रसारण : २१ चॅनेलना नोटिसा

By : Admin | Category : ठळक घडामोडी | On : 28-12-2009 | Comments : 1

अश्लील, बिभत्स व लहान मुलांनी पाहण्यास अयोग्य अशा कार्यक्रमांचे प्रसारण करणाऱ्या सात खासगी टीव्ही चॅनेल्सचे प्रक्षेपण केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत कायमचे बंद केले असून इतर २१ चॅनेलना याच कारणांवरून ठरवून दिलेली लक्ष्मणरेषा ओलांडल्याबद्दल २७ कारणे दाखवा नोटिसा बजाल्या आहेत.

भ्रष्ट अधिकाऱ्यांना चाप

By : Admin | Category : बोल मुंबई बोल | On : 27-12-2009 | Comments : 2

सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन हे न्याय व्यवस्था, तसेचतपास यंत्रणा यांच्यातील सुधारणांसाठी आग्रही आहेत. बालकृष्णन यांनीगेल्या वर्षभरात या विषयावर विविध व्यासपीठांवरून मतप्रदर्शन केले. न्यायव्यवस्था व तपास यंत्रणा यांची पुनर्रचना कोणत्या दिशेने व्हावी, हेसरन्यायाधीश सुचवीत असतात.

युवा महोत्सवाला आजपासून प्रारंभ

By : Admin | Category : विशेष कार्यक्रम | On : 27-12-2009 | Comments : 0

राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने दरवर्षी आयोजित केला जाणारा युवा महोत्सव यंदा मुंबईत होत असून येत्या सोमवारपासून या महोत्सवाला प्रारंभ होणार आहे.

गुलाबी थंडीत साजरा होणार मुंबईकरांचा थर्टी फर्स्ट

By : Admin | Category : ठळक घडामोडी | On : 27-12-2009 | Comments : 0

नाताळच्या दिवसापासून जाणवत असलेला गारवा आणि सकाळी सुटणारी गार हवा वर्षअखेरपर्यंत कायम राहणार असून थटीर्र्फस्ट आणि नव्या वर्षातला पहिलाच वीकेण्ड धडाक्यातच नव्हे, तर थंडीच्या कडाक्यातही साजरा करण्याची डबल मजा अनुभवता येणार आहे.

‘प्लास्टिक पिशव्या’बंदी आता मुंबईतही?

By : Admin | Category : ठळक घडामोडी | On : 27-12-2009 | Comments : 1

पुणे महानगरपालिकेने प्लास्टिक पिशव्यांवर १०० टक्के बंदी घातण्याचा निर्णय घेताच मुंबईतही तशीच बंदी आणण्याच्या महापौर श्रद्धा जाधव यांचा प्रस्ताव आहे. त्यांच्या या प्रस्तावाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असले तरी ही बंदी व्यवहार्य करण्यासाठी जनजागृती, उत्पादनावर नियंत्रण आणि प्लास्टिक पिशव्यांची विल्हेवाट या तीन्ही स्तरांवर प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.